राज्य सरकारने एसआयटीचं रेशन केलं आहे, मागेल त्याला एसआयटी – संजय राऊत

२४ डिसेंबर २०२२


राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी सत्ताधारी आमदारांनी थेट आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं असून प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यासाठी SIT अर्थात विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने नवीन रेशनची पॉलिसी जाहीर केली आहे. गरिबांना रेशन देण्यासंदर्भात. त्यापद्धतीने राज्य सरकारने एसआयटीचं रेशन केलं आहे. मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात ४० आमदार ज्या पद्धतीने ५० खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता, त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. पण जे विषय पोलीस, सीबीआयनं संपवलेत, त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत. तुम्ही तौंडावर पडाल, असं संजय राऊत म्हणाले.

सरकरी पक्षातल्या अनेकांची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यांचाही आता तपास होईल. आम्ही दोन दिवस नागपुरात जात आहोत. तेव्हा अनेक विषय आम्ही समोर आणू. त्यावरही एसआयटीची मागणी करू. या सरकारला एसआयटी स्थापन करायची फार खाज आहे. खाजवत बसा. एसआयटी ही अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांत स्थापन केली जाते. पण या सरकारने एसआयटी आणि पोलिसांचं महत्त्वच कमी करून टाकलंय. उठसूठ एसआयटी स्थापन करायची, पोलिसांना काही कामच ठेवायचं नाही.विधानसभेत कुणीही उठतो आणि एसआयटीची मागणी करतो असंही राऊत म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *