चिखली, मोशीमध्ये घरफोडी; चार लाखांचा ऐवज चोरीला

२४ डिसेंबर २०२२

पिंपरी


चिखली, मोशी परिसरात घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत . याप्रकरणी गुरुवारी दि . २३ संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . दोन्ही घटनांमध्ये तीन लाख ९ ८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. चिखली पोलिस ठाण्यात ३३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली . त्यानुसार , अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी यांच्या घरातून २३ नोव्हेंबर ते १ ९ डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी एक लाख १३ हजार रुपये किमतीचे ५६.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.  चिखली पोलिस तपास करीत आहेत. दुसऱ्या गुन्ह्यात संदेश भगवान गावडे ३० , रा . मोशी प्राधिकरण यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार , अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बुधवारी दि . २१ सकाळी सहा ते सायंकाळी साडेपाचच्या कालावधीत गावडे घराला कुलूप लावून कामाला गेले होते . दरम्यान , अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला . घरातून कपाटाच्या लॉकर मधून दोन लाख ८२ हजार रुपये किमतीचे ९ .४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि तीन हजारांचे चांदीचे पैंजण असा दोन लाख ८५ हजारांचा ऐवज चोरून नेला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *