महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद; दोन्ही राज्यांच्या राज्यपालांची आज बैठक

२४ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा वरती जिल्ह्यांबाबत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी दोन्ही राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांची संयुक्त बैठक अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे होणार आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांच्या उपस्थितीत सीमा भागातील जिल्ह्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर महाराष्ट्रातील भंडारा नागपूर अमरावती बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशातील बालाघाट,शिवनी, शिंदवाडा, बैतुल, बुरानपुर,खंडवा, हारगोन,बडवाणी,आणि अलीराजपूर या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *