शिरूर शहर व तालुक्यातील मशिदीवरील अनधिकृत व बेकायदेशीर भोंगे त्वरित काढून, सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी : मनसे, शिरूर

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
२६ एप्रिल २०२२

शिरूर


शिरूर तालुका मनसेच्या वतीने नुकतेच शिरूर पोलीसांना एक निवेदन देण्यात आलेले आहे. त्यात असे म्हटलेले आहे की, “मे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून, शिरूर तालुक्यात व शहरातील अनेक भागांमध्ये मशिदींवर बेकायदेशीर व अनधिकृत भोंगे लावण्यात आलेले आहेत. सदर भोंगे काढून टाकण्याबाबत मा. सर्वोच्य न्यायालयाने आदेशही पारित केलेले आहेत. तरी आमची प्रशासनास विनंती आहे की, दि. ०३/०५/२०२२ पर्यंत काढून टाकून, संवैधानिक विचार सर्व नागरिकांच्या मनात रुजवून, कायदेशीर बाबी पूर्ण करून कायद्याचे राज्य अबाधित ठेवावे व जातीय सलोखा राखण्यास मदत करावी. असे न झालेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तालुका व शहराच्या वतीने कायद्याची कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल. तसेच मा. राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ३ तारखेपर्यंत सदर बेकायदेशीर व अनधिकृत भोंगे न उतरविलेस “हनुमान चालीसा लावून त्याचे पठण केले जाईल” याची नोंद घ्यावी.” तसेच, “कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस त्यास सर्वस्वी प्रशासन जाबाबदार राहील.” असाही गर्भित इशारा या निवेदनाद्वारे मनसे ने दिलाय.

हे निवेदन देतेवेळी मनसे सहकार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास नरके, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ऍड स्वप्नील माळवे, महिला तालुकाध्यक्षा डॉ वैशाली साखरे, शिरूर शहराध्यक्षा शारदा भुजबळ, बंडू दुधाने, श्रीकांत नरके, सुदाम चव्हाण व संजोग चव्हाण उपस्थित होते. पोलीस व प्रशासन, आता यावर काय उपाययोजना करेल ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *