राहुल शेवाळेंच्या आरोपाला आदित्य ठाकरेंचा प्रत्युत्तर

२२ डिसेंबर २०२२


शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूआधी रिया चक्रवर्तीला ‘एयू’ नावाने ४४ वेळा फोन कॉल आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा आरोप राहुल शेवाळेंनी केला आहे. लोकसभेत प्रश्न उपस्थित करत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. राहुल शेवाळेंच्या आरोपाला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. यावरून लक्ष हटवण्यासाठी राहुल शेवाळे यांनी आपल्यावर आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *