पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ सप्टेंबर २०२२


पीएफआयवर केंद्र सरकारने ५ वर्षाची बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलेंट किलर’ असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

पीएफआय सायलेंट किलर – देवेंद्र फडणवीस 

पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा तयार केली होती. खूप मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडायची आणि या खात्यांमध्ये कुणाला संशय येऊ नये, यासाठी थोडे पैसे जमा करायचे”, असा प्रकार या संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआयवर घातलेल्या बंदीसंदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार असून पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *