मंत्रालयामध्ये पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

१७ नोव्हेंबर २०२२


मुंबईतील मंत्रालय परिसरात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक होती. दुपारच्या वेळी या तरुणाने मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उडी मारली. अनेकदा मंत्रालयाच्या इमारतीवरून नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे.

उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव बापू मोकाशी असून दुपारी तीनच्या सुमारास त्यांनी मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली. या आधी घडलेल्या अशाच घटनांनंतर अशा प्रकारचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी येथे सुरक्षा जाळी बसवण्यात आली आहे. यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत.मोकाशी यांना या घटनेनंतर पोलिसांनी जाळीतून बाहेर काढत रुग्णालयात नेले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *