राज्यातील वीस आणि त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाही – शिक्षण मंत्री दिपक केसरकर

२२ डिसेंबर २०२२


काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथे ४३ पटसंख्या असलेली शाळा बंद करण्यात आली असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करण्यात आला. स्थानिक प्रशासनाने शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी बकरी आंदोलन केले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी पालघरमधील सायवन, त्यालगतच्या पट्ट्यांमध्ये आणि इतर भागांमध्ये आदिवासी भागात एक किमीच्या अंतरात शाळा नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. सरकारने शाळा बंद केल्यास आदिवासी विद्यार्थ्यांनी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला.

याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, २० आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येणार नाही. तसा शासनाचाही विचार नसल्याचे केसरकर यांनी म्हटले. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे सरकार या शाळा बंद करणार, असा अनेकांचा समज झाला. मात्र, ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल, त्याला त्या ठिकाणी योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का, हा मुद्दा आहे. त्यामुळे मुलांच्या हिताचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले. दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची प्राथमिकता आहे. असे म्हणत विधानसभेत केसरकर राज्यातील २० आणि त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नसल्याचे सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *