पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकी बाबत आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिली महत्वाची माहिती

दि. २७ आंबेगाव : – ( प्रतिनिधी मोसीन काठेवाडी )

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर 2020 रोजी होणार असून आंबेगाव तालुक्यात मतदानासाठी 8 मतदान केंद्र असणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात पदवीधर मतदारांची संख्या १९०२ व शिक्षक मतदारांची संख्या ७४५ आहे. केंद्रनिहाय 4 पदवीधर व 4 शिक्षक निवडणूक मतदान केंद्र पुढील प्रमाणे आहेत.

1)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंभे खुर्द – पदवीधर मतदारसंख्या १४९,1) शिक्षक मतदारसंख्या ८८

2) जनता विद्या मंदिर घोडेगाव -पदवीधर मतदार संख्या ४१८

3) ,शिक्षक मतदार संख्या- २२३. 3)महात्मा गांधी विद्यालय मंचर पदवीधर मतदार संख्या ८५१. 3)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर – शिक्षक मतदार संख्या -३०४.

4)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक- पदवीधर मतदारसंख्या ४८४, 4)शिक्षक मतदार संख्या १३० आहे.

मंगळवार दिनांक १ डिसेंबर 2020 रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर 2020 बालेवाडी क्रिडा संकुल म्हाळुंगे- पुणे रोजी होणार आहे.

आंबेगाव तालुक्यातमतदार जनजागृती करण्यासाठी तहसील कार्यालयात स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्याद्वारे आंबेगाव तालुक्यात तहसिलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवून नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन मतदार जनजागृती पथक सदस्य सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे, विजय घिसे, राहुल रहाटाडे, मंगेश जावळे, अशोक लोखंडे,संदीप बोंबले यांच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती मतदार जनजागृती पथक प्रमुख सुनील भेके यांनी दिली.

—-मत कसे नोंदवावे-—–
१) केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केचपेननेच मत नोंदवावे इतर कोणताही पेन-पेन्सिल बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये.
२) तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील “पसंतीक्रम नोंदवावा” या रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवावे.
३) निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता.
४) आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2,3,4 इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकता.
५) एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये.
६) पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अशा अंकामध्ये नोंदवण्यात यावेत हे एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवण्यात येऊ नयेत.
७) पसंतीक्रम नोंदवतांना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपात किंवा मराठी भाषेतील देवनागरी १,२,३ या स्वरूपात नोंदवावे.
८) मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये.
९) मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क√ किंवा क्रॉस मार्क × अशी खूण करु नये अशी मतपत्रिका अवैध ठरेल.
१०) आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.
सबब पदवीधर व शिक्षक निवडणूक सन 2020 मधील मतदार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *