खोपोली नजिक 3 वाहनांचा अपघात, सुदैवाने प्राणहानी नाही

सुहास मातोंडकर | प्रतिनिधी
२२ डिसेंबर २०२२

पिंपरी


खोपोली पोलीसठाण्याच्या हद्दीत आज गुरुवारी सकाळी 6 च्या ट्रक आणि कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. मात्र, प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईकडे जाणारा ट्रक क्र TN -39-CM 9227 वरील चालक आर. अरुण -36, रा. कर्नाटक याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे जाणाऱ्या आय 20 कार क्र MH- 48 -P -3689 ला मागून धडक दिली, त्यानंतर पुढच्या कार क्र MH -12-GK -4286 ला धडक मारून काही अंतर फरफटत नेले. यात कार मधील महिला जखमी झाली तीला उपचारासाठी महात्मा गांधी स्मृती रुग्णालय, पनवेल येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अपघातात बाधित झालेल्या दोन्ही कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावल्याने मोठी हानी टळली असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघाताची माहिती मिळताच आय आर बी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, बोरघाट वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्सचे जवान मदतीसाठी आल्याने मदतकार्य वेळेत पार पडले. बाधित वाहने लागलीच बाजूला काढल्यामुळे वाहतूकही खुली झाली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *