शिरूर पोलिसांची धडक कारवाई, गावठी दारुसाठी लागणारा कच्चा माल विकणाऱ्या शिरूरच्या प्रसिद्ध व्यापाऱ्यावर कारवाई…

बातमी : विभागीय संपादक, रवींद्र खुडे.

शिरूर :
दि. 26/05/2021

काही दिवसांपूर्वी शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी, फाकटे, मुंजाळवाडी, कवठे येमाई परिसरात अवैध गावठी दारू बनवणारे दारू भट्ट्यावर व देशी-विदेशी दारू विकणारे यांच्यावर, शिरूर पोलिसांनी धडक कारवाई करत, ४ लाख ८८ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. तशी बातमी आपला आवाज न्यूज नेटवर्क ने दि. १८ मे २०२१ रोजी प्रसिद्ध केली होती. परंतु गावठी दारू तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल विक्री करणारा, शिरूरचा एक प्रतिष्ठित व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्याला पुराव्याशिवाय ताब्यात घेणे अवघड असल्याने, पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, शिरूर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून या व्यापाऱ्याला हा कच्चा माल विक्री करताना रंगेहात पकडलेय.

त्यामुळे, हातभट्टीस लागणारा कच्चा माल पुरवणारा शिरूर येथील प्रसिद्ध व्यापारी विनय वंसतलाल संघवी, यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
या कारवाईत –
१) संदीप भानुदास घोडे (रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे),
२) अर्जुन सदाशिव हिल्लाळ,
३) सागर गुडगुल,
४) शुभम पांडुरंग मुंजाळ (सर्व रा. कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे),
५) उमेश चंदु गायकवाड ( रा. फाकटे, ता. शिरूर)
या पाच जणांवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिलीय.
याबाबत आधिक माहिती अशी की,
दि. १५ मे २०२१ रोजी, गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की,
टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे हददीमध्ये, अवैध्यरित्या देशी व विदेशी दारूची विक्री चालु आहे.
अशी बातमी मिळाल्याने तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनकडील सपोनि संदीप कांबळे, पोसई विक्रम जाधव, महिला पोसई स्नेहल चरापले, सहा. फौजदार नजिम पठाण, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार आण्णासाहेब कोळेकर, पोलीस अंमलदार करणसिंग जारवाल, पोलीस अंमलदार विशाल पालवे, पोलीस अंमलदार सुरेश नागलोत यांना पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेवुन, बातमीचा आशय समाजावुन सांगुन स्वतः पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे पोलीस पथकासह कारवाई करण्यासाठी टाकळी हाजी, फाकटे, मुंजाळवाडी व कवठे यमाई अशा विविध ठिकाणी छापा टाकत त्यात एकुण ५० लिटर गावठी हातभटटीची तयार दारू, ४३ प्लॅस्टिकचे बॅरल प्रत्येकी २०० लि. मापाचे व त्यामध्ये एकुण ८६०० लि. गावठी हातभटटी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, दोन लोखंडी बॅरल व इतर साहीत्य मिळून आल्याने, ते साहित्य जागेवरच नष्ट केले. तसेच देशी व विदेशी दारूच्या एकुण ११५ बाटल्या व मुददेमाल जप्त करण्यात आला.
तर गावठी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन पोलीसांनी जागेवरच उद्धवस्त केले.
यात वरील दोषी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कलम ६५ क, फ या कायदयान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेला असुन, सदरील आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना चार दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली.
पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी हातभट्टी बनविणाऱ्या आरोपींची कसुन चौकशी केली असता, हातभट्टी बनविण्यास लागणारा कच्चा माल हा शिरूर येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याकडून आणला असल्याचे आरोपींनी तपासात कबुली दिली.
आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सपोनि बिरुदेव काबुगडे यांनी सदरील व्यापाऱ्याकडे एक डमी ग्राहक पाठविला व त्या ग्राहकाने हातभट्टी साठी लागणारे नवसागर द्या अशी मागणी केली. त्या व्यापाऱ्याने लगेचच तो माल देताच, विनय वसंतलाल संगवी या व्यापाऱ्यास रंगेहाथ पकडून अटक करुन, त्याच्याकडून या कच्च्या मालाचा एक बॉक्स जप्त करण्यात आला असून, या व्यापाऱ्यास वरील गुन्ह्यात सहआरोपी केले असून, त्याला ताब्यात घेतले होते. या व्यापाऱ्याला जामीन मंजूर झाल्याचे समजते आहे.
वास्तविक पाहता नवसागर हे शेतकरी किंवा औषधे बनविणाऱ्यास विकणे आवश्यक होते. मात्र हा व्यापारी हातभट्टी बनविण्यासाठी विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पुढील अधिक तपास, पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बिरूदेव काबुगडे, सपोनि संदीप कांबळे, सहा. फौज. नजिम पठाण, पोलीस नाईक सांगळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *