हेल्मेट न देणाऱ्या वाहन वितरकांवर कारवाई करा

०९ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


ग्राहकाने दुचाकी खरेदी केल्यानंतर त्यांना हेल्मेट न देणाऱ्या शहरातील वाहन वितरकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अपना वतन संघटनेने परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड व शहर पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चालू वर्षात पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर सर्वच कंपन्यांच्या दुचाकींची विक्री मोठ्या प्रमाणात झालेली आहे. केंद्रीय मोटार वाहन अधिनियमानुसार दुचाकी वितरकांनी ग्राहकाला हेल्मेट देणे बंधनकारक आहे. रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी दुचाकीची विक्री करतानाच खरेदीदाराला दोन हेल्मेट देण्याचा नियम आहे. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नसून, नागरिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा त्यांना हेल्मेट न देता दुचाकी वाहन वितरक ग्राहकांचा विश्वासघात व फसवणूक करीत आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

‘रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने २०२१ मध्ये दुचाकी खरेदी करतानाच वितरकाने हेल्मेट देण्याबाबत सूचना केलेल्या होत्या तसेच केंद्रीय मोटार परिवहन कायद्यानुसार तसेच मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार हेल्मेट देणे बंधनकारक आहे. परंतु याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अशा वितरकांवर गुन्हे दाखल करावेत.- सिद्दिक शेख, अध्यक्ष अपना वतन संघटना.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *