सहनशीलता संपली आता कर्नाटक सरकारला जशास तसे उत्तर देऊ – शंभूराज देसाई

२१ डिसेंबर २०२२


राज्याची एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी कर्नाटक विधानसभेत घेतली. सीमा वादावर झालेल्या चर्चेदरम्यान राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याची सूचना केली. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यावर शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले , कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी अरेरावी केली. याचा शिंदे फडणवीस सरकारने निषेध केला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब न्यायप्रविष्ट असताना अशा भाषा वापरणे शोभत नाही. अरेरावीची भाषा करू नये. आता विधान केली तर तश्याचं तस उत्तर देऊ. शिंदे फडणवीस सरकार आता कर्नाटक सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठी भाषिकांना सांगतो की त्यांनी घाबरू नये. सीमावर्ती भागातील जनतेसोबत आम्ही आहोत. एकही इंच जागा सोडणार नाही. सहन करायला काही मर्यादा असते असते. सहनशीलता संपली आता कर्नाटक सरकारला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा शंभूराज देसाई यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *