संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा; टीका करताना संतोष बांगर यांची जीभ घसरली

२१ डिसेंबर २०२२


कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रोज उठून महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत येतात, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. दरम्यान, राऊतांच्या या टीकेबाबत बोलताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे.

संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा. त्याच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तो आमच्या नेत्याबद्दल असं विधान करत असेल, तर ज्या ठिकाणी तो मिळेल, त्याठिकाणी त्याला ठेचल्याशिवाय राहणार नाही, असं प्रत्युत्तर संतोष बांगर यांनी दिले आहे. महाविकास आघाडीकडे टीका करण्याशिवाय दुसरं काहीही उरलेलं नाही, त्यामुळे त्यांना टीका करू द्या, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *