दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला धक्का; कर्णधार रोहितसह वेगवान गोलंदाजही संघाबाहेर

२० डिसेंबर २०२२


भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून सध्या कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या कसोटीत विजयानंतर आता दुसरा सामना २२ डिसेंबरपासून भारत खेळणार आहे. पण या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला ‘डबल धक्का’ बसला आहे.

टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर आता दुसरा सामनाही खेळणार नसून त्याच्यासोबत युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा देखील स्नायूमध्ये ताण आल्याने मालिकेबाहेर झाला आहे. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट कर ही माहिती दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *