ऋतुजा ने उंचावली देशाची मान आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मिळवली चार सुवर्णपदके

पिंपरी प्रतिनिधी
०६ ऑक्टोबर २०२२


मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत भारताकडून टिम स्पोर्ट्स एल़़. यु. पि. इंडिया तर्फे सहभागी झालेल्या ऋतुजा पाटील हिने विविध स्केटिंग प्रकारात स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकून देशाची मान उंचावली. 24 व 25 सप्टेंबर रोजी मालदिव येथील माले सिटी व हूलहू माले सिटी येथे रोलर स्केटिंग असोसिएशन ऑफ मालदीव स्केटिंग फेडरेशन तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनेक देशातील 123 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

मालदीव ऑलम्पिक कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल सत्तार, माजी ऑलिम्पिक कमिटी अध्यक्ष इब्राहिम इस्माईल, स्पोर्ट्स मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ मालदीव उपमंत्री व अध्यक्ष महंमद अजमीत तसेच टिम स्पोर्ट्स एल़़. यु. पि. इंडिया चे अध्यक्ष वैभव बिळगी सर यांच्या हस्ते ऋतुजाला सुवर्णपदके व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी टिम स्पोर्ट्स एल़़. यु. पि. इंडिया चे व्यवस्थापक राहुल बिळगी, टीम कॉर्डिनेटर रिषभ कावेडिया आदी उपस्थित होते.

ऋतुजा ची वाकड तसेच पिंपळे सौदागर येथील ड्रीम्स स्केटिंग क्लब मध्ये वैभव सरांकडे स्केटिंग चा सराव करते. गोवा येथे 7 व 8 जून 2022 ला संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ऋतुजा ने प्रथम क्रमांक मिळवला व तीस हजार ची इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप ही तिला मिळाली होती. दरवर्षी गोवा स्केटिंग फेस्टिवल मध्ये विजेत्या मुलांना स्पोर्ट्स एल यु इंडिया तर्फे इंटरनॅशनल स्पॉन्सरशिप दिली जाते ती स्पॉन्सरशिप ऋतुजाला ही मिळाली होती तसेच तिची निवड निश्चित होताच वैभव बिलगी यांनी तिच्याकडून दररोज 40 ते 50 किलोमीटरचा स्केटिंग सराव करून घेत होते तसेच ऋतुजा ने इतके कठीण ट्रेनिंग ला सामोरे जात सरांनी दिलेल्या वेळेत सराव पूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होती. ऋतुजा मुळातच भोसरी चिंचवड येथे येथील रहिवासी आहे स्केटिंग बद्दल परिवारातील सर्व घटक अनभिज्ञ असताना तिच्या आई वडिलांनी तिची आवड व जिद्द बघून तिला सर्व तो सपोर्ट करत तिला नवीन स्टकेट्स तसेच दोन लाखाचे साहित्य आणून देऊन तिला यशस्वी होण्यात मोठी मदत केली.

ऋतुजा चे वडील श्रीराम रघुनाथ पाटील व आई रजनी पाटील हे नोकरीनिमित्त भोसरी चिंचवड येथे स्थायिक झाल्यामुळे ऋतुजा चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिंचवड येथेच चालू असून ती सध्या एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल मोरवाडी पिंपरी योथे सातवीत शिक्षण घेत आहे. ऋतुजा चे यश बघून स्कूल चे अध्यक्ष डॉ. दशरथ भोसले व मोरवाडी शाखेच्या प्रिन्सिपल यांनी तिला बारावीपर्यंत शिक्षणात 50% फी मध्ये सवलत स्कॉलरशिप देण्यात आली. ऋतुजा ने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केल्याने तिचा मायदेशी येताच पिंपरी-चिंचवड करांनी व पुणेकरांनी भव्य मिरवणूक काढून सन्मान केला व कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *