साइबर फ्रॉड झाला तर घाबरू नका, 1930 वर करा कॉल

०४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


अ‍ॅप लोनच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या नागरिकांनी घाबरून न जाता तक्रारीसाठी पुढे यावे असे आवाहन पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल या वेबसाइटवर तक्रार नोंदविता येते . कोरोना महामारीमुळे अनेकांचा रोजगार गेला . त्यामुळे अनेकांना कर्ज घ्यावे लागले . याचा गैरफायदा घेत , अॅपच्या माध्यमातून कर्ज देण्याचा फंडा सायबर भामट्यांनी अवलंबला यातून संबंधित व्यक्तीच्या फोनमधील संपर्क क्रमांक सायबर भामट्यांनी घेतले जातात . कर्जाची परतफेड केल्यानंतरही त्यांच्याकडून सातत्याने पैशांची मागणी केली जाते . पैसे देण्यास नकार दिल्यास संबंधिताचे आधार कार्ड , पॅन कार्ड किंवा इतर फोटो अश्लील मॉर्फ केले जातात.

केंद्रीय गृहमंत्रालयाची हेल्पलाइन देशभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे . त्यामुळे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने https://cybercrime.gov.in/ ही वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे . नॅशनल सायबर क्राइम रिपोटिंग पोर्टलवर १ ९ ३० हा हेल्पलाइन क्रमांकही उपलब्ध केला आहे. हा क्रमांक डायल केल्यानंतर राज्यातील भाषेनुसार पर्याय निवडता येतो. स्थानिक पोलिसांकडे वर्ग होते तक्रार नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंदविलेली तक्रार स्थानिक पोलिसांच्या सायबर सेलकडे वर्ग केली जाते . त्यानंतर , स्थानिक पोलिसांकडून तपास केला जातो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *