महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

१९ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातील महामेळावा रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी नेत्यांची धरपकड सुरू करण्याचा मुद्दा आणि सीमेवर महाराष्ट्रातील नेत्यांना अडवल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सीमाभागातील आमच्या बांधवांच्या पाठिशी सभागृह आणि सरकार आहे. आजपर्यंत दोन राज्ये भांडत होती. पण केंद्राने लक्ष दिलं नाही. आता गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. आपल्या नेत्यांनी गृहमंत्र्यांकडे स्पष्ट भूमिका मांडली. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे ट्विट्स हे प्रक्षोभक आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ते ट्विट्स माझे नसल्याचं स्पष्ट केलं. त्या बैठकीत कुणीही वेगळा दावा करणार नाही. नागरिकांवर अत्याचार होणार नाही, वाहनांवर दगडफेक होणार नाही,असं ठरल्याचंही फडणवीस यांनी सांगितले. त्या बैठकीत तीन-तीन मंत्री नेमायचे. दोन राज्यात समन्वय राहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले. आज जे आंदोलन होते, त्यात अनेक नागरिक आणि आमदार होते. काहींना अटक करण्यात आली. त्यांना आम्ही सोडवूनच आणू. आम्हाला तिथे लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र कर्नाटक सरकारने चुकीच्या पद्धतीने ही अटक केलेली आहे.

कर्नाटक ज्या पद्धतीने सर्वपक्षीय एक भूमिका घेत आहे. तशी भूमिका आपणही घेतली पाहिजे. आंदोलन रोखण्याचा आणि अटकेचा निषेध आम्ही कळवणार आहोत, अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *