पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांना स्थायी समिती अध्यक्ष नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ८४ कोटी २६ लाख रुपयांच्या कामाला मंजुरी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, दि. २७ मे २०२१
चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर वाड्याच्या तिस-या टप्‍प्याची कामे करणेकामी येणा-या ३ कोटी १९ लाख इतक्या खर्चासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि येणा-या सुमारे ८४ कोटी २६ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

महानगरपालिकेचे डेटा सेंटर मधील सर्व्हर, नेटवर्क स्वीचेस, टेप लायब्ररी, स्टोरोज यांची वॉरंटी एक वर्षे कालावधीसाठी वाढविणे व फायरवॉल अपग्रेड करणेकामी येणा-या १ कोटी १६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. १२ रूपीनगर येथील ठाकरे शाळा आणि खेळाचे मैदानाची देखभाल दुरूस्ती करण्याकामी येणा-या २६ लाख ७२ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र ११ मधील मैलाशुद्धीकरण केंद्रास सिमाभिंत बांधणे व इतर कामे करणेकामी येणा-या ९८ लाख ४३ त्रेचाळीस हजार, प्रभाग क्र १२ त्रिवेणीनगर परिसातील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणा-या ४५ लाख ०५ हजार, गणेशनगर परिसरातील रस्त्याचे खडीमुरूमीकरण व डांबरीकरण करणेकामी येणा-या ५४ लाख ५८ हजार तसेच प्रभाग क्र ११ मध्ये विविध ठिकाणी पेव्हींग ब्लाँक बसविणे व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या ६० लाख, प्र.क्र.२५ वाकड येथील सदगुरु कॉलनी, चौधरीपार्क, स्वामी विवेकानंदनगर व प्रभागातील इतर परिसरातील फुटपाथ, पेव्ह‍िंग ब्लॉकची दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या २७ लाख ९४ हजार, प्रभाग क्र.६ मध्ये मोहननगर, सदगुरूनगर, लांडगेवस्ती, महादेव नगर, मधुबन सोसायटी व परिसरामध्ये रस्त्यांची खडीकरण व बी बी एम पध्दतीने सुधारणा करणेकामी येणा-या ५१ लाख ८९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

        चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत प्रभाग क्र.१० मधील झोपडपट्टी परिसरात जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी  जलनिःसारण नलिका टाकणेकामी येणा-या ३३ लाख ७७ हजार, प्रभाग क्र.१९ मधील भाटनगर, भीमनगर, निराधारनगर व इतर परिसरात  जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी  जलनिःसारण नलिका टाकणेकामी २८  लाख ८८ हजार तर  प्रभाग क्र.१९ मधील  श्रीधरनगर, दत्त मंदिर व इतर परिसरात  जलनि:सारण विषयक सुधारणा कामे करणे व उर्वरित ठिकाणी  जलनिःसारण नलिका टाकणेकामी येणा-या २८ लाख ५४ हजार  इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र.५ मधील परीसरात स्थापत्य विषयक किरकोळ देखभाल दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या ३७ लाख ३४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या विद्युत विभागाकडील प्र.क्र.१७ मध्ये शिवनगरी भागात व वाल्हेकरवाडी भोंडवे वस्तीभागात रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करणे अंतर्गत विदयुत विषयक कामे करणे (२०१९-२०) कामी ८४ लाख ४६ हजार तसेच प्रभाग क्र.१६ विकासनगर येथील नाल्याकड़ील पेट्रोलपंप (लोटस स्कीम) ते बापदेवनगर पर्यंतचा १८ मी. डी.पी. रस्ता विकसित करणे, विद्युत विषयक कामे करणेकामी ७२ लाख ३४ हजार तसेच मामुर्डी येथील १८.०० मी.डी.पी. व इतर रस्ते विकसित करणेकामी ९२ लाख ६९ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र.१६ विकासनगर येथील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करणेकामी येणा-या ३७ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या पर्यावरण विभागाकडील मनपाचे क, ड, इ व ह क्षेत्रिय कार्यालयांतर्गत मैला शुध्दीकरण केंद्र व पंप हाऊस मधील विदयुत विषयक देखभाल व दुरुस्ती करणेकामी येणा-या १कोटी ०४ लाख तसेच मनपाचे अ, ब, फ व ग क्षेत्रिय कार्यालयांतर्गत मैला शुध्दीकरण केंद्र व पंप हाऊस मधील विदयुत विषयक देखभाल व दुरुस्ती करणेकामी १ कोटी ०४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१६ मध्ये रावेत भागातील शिंदेवस्ती व राजयोग कॉलनी जवळील नाला बांधणे व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या ६४ लाख ९४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या जलनि:सारण विभागाकडील से.क्र. २२, परिसरातील जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणेकामी येणा-या ३७ लाख ८३ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्र.क्र.२१ मधील विविध मनपा इमारतींचे रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या ३१ लाख इतक्या खर्चास मान्यता दिली असे.

मनपाच्या स्थापत्य विभागाकडील वेताळनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील उर्वरित स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या २६ लाख ५३ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र.६ मधील भगत वस्ती, गुळवे वस्ती, धावडे वस्ती व परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणेकामी येणा-या २६ लाख ३४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाच्या स्थापत्य विभागाकडील प्रभाग क्र.२५ वाकड येथील कलाटे पार्क व इतर परिसरातील डी.पी. रस्ते अद्ययावत पध्दतीने विकसीत करणेकामी येणा-या १७ कोटी ६२ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *