शहरात आतापर्यंत १७ बालकांना गोवरची लागण

१६ डिसेंबर २०२२

पिंपरी


शहरात आतापर्यंत गोवरची एकूण १७ बालकांना लागण झाली आहे . त्यामध्ये गेल्या महिनाभरात आढळलेल्या १३ बाधित रुग्णांचा समावेश आहे . तर , ३८२ संशयित बालरुग्ण आढळले आहेत . गेल्या साडेअकरा महिन्यांतील ही परिस्थिती आहे.थेरगावमध्ये २ रुग्ण नव्याने आढळलेल्या १३ बालरुग्णांमध्ये कुदळवाडीमधील ५ , थेरगावमधील २ रुग्णांचा समावेश आहे. त्याशिवाय , शहरातील मोशी व अन्य भागात ६ रुग्ण आढळले आहेत . शहरात १ जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे ३८ ९ संशयित रुग्ण आढळले. आहेत . त्यापैकी १७ रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे .

३ हजार ९ ४ बालकांना डोस महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत २ लाख ३८ हजार ५० ९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे . तर , ८ लाख ४८ हजार ३८ ९ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे . पाच वर्षांखालील ५२ हजार ९९ २ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे . व्हिटॅमिन एची मात्रा २७ हजार ८०८ बालकांना देण्यात आली आहे . ३ हजार ९ ४ बालकांना गोवर रुबेलाचा पाहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *