इतकं सामान्य ज्ञान रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणाऱ्या सर्वज्ञानींना असू नये? चित्रा वाघ यांचा संजय राऊतांना टोला

१६ डिसेंबर २०२२


भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटल्याचं समोर आलं आहे. यावरून चित्र वाघ यांनी ट्वीटद्वारे संजय राऊतांना टोला लगावला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणाऱ्या महामानव डॉ.बाबासाहेबांबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय? महापुरूषांचा असा अपमान तुम्ही करायचा आणि स्वतःचं मोर्चे काढायचे. मुर्ख समजू नका…महाराष्ट्र तुम्हाला पुरतां ओळखून आहे. तुमचा जाहिर निषेध, असं ट्विट चित्र वाघ यांनी केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *