मुंजाबा डोंगरावर करत राहणार वृक्षारोपण -राजश्री तांबे

प्रतिनिधी -कैलास बोडके
निसर्गसौंदर्याने नटलेल्या जुन्नर तालुक्यातील डोमेवाड़ी (ओतुर) येथे असणाऱ्या निसर्गरम्य मुंजाबा डोंगरावर दरवर्षी वृक्षारोपण करण्याचा संकल्प ओतूर येथील काही तरुणांनी हाती घेतला असल्याची माहिती राजश्री तांबे यांनी दिली. एक छोटासा संकल्प मनी घेऊन केलेलं कार्य नक्कीच आपल्या सर्वांच्या फायद्याचं ठरेल असे त्यांनी सांगितले.


निसर्ग सेवा म्हणजे ही आपली स्वतःची सेवा आहे निसर्गा पुढे आपण नाही आणि निसर्ग शिवाय आपण नाही, म्हणूनच मनी घेतलेल्या हा संकल्प नक्कीच आपण सर्वांनी शक्य तितका हातभार लावावा अशी विनंती देखील त्यांनी यावेळी केली आहे. याही वर्षी मुंजबा डोंगर व आजूबाजच्या परिसरात बीया रुजवण्याचे काम करायचे आहे तरी आपण सर्वांनी या संकल्पनेत सहभागी होऊन बीया गोळा करायचे काम सुरू करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात अनेक फळझाडे, जंगली झाडे, आंबा, पेरू, उंबर, आंबट चिंच, काटेरी चिंच, गोडी बाभळ, सूबाभळ, गुलमोहर, साग, सीताफळ, रामफळ, कडीपत्ता, करंज, करवंदे, जांभूळ, बदाम आदी प्रकरच्या बीया किंवा रोपे आपल्या सोभवती असतील तर गोळा करण्यास सुरवात करा त्याच बरोबर शक्य झाले तर वड व पिंपळ या दोन्ही झाडाच्या छोट्या छोट्या फांद्या कट करून कुंडीत लावल्या तर त्यांचे सुधा रोपे तयार करून आपण लाऊ शकतो असे देखील त्या म्हणाल्या यावर्षी देखील त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे.


या संकल्पनेतून त्यांनी निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करण्याचा संदेश दिला आहे. या प्रसंगी प्रकाश तांबे, राजश्री तांबे, नवनाथ तांबे, भूषण तांबे, विवेक तांबे, करण तांबे, कार्तिक तांबे, धनश्री तांबे, मानसी तांबे, दिव्या तांबे, समर्थ तांबे, सुजल तांबे, चैतन्य तांबे, किरण तांबे, अश्विनी तांबे, सानिका डुंबरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *