गुजरात निवडणुकीनंतर ‘आप’ बनला देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष

०९ डिसेंबर २०२२


आम आदमी पक्षाने आज राष्ट्रीय पक्ष बनण्याचा दर्जा मिळवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गुजरातच्या जनतेने आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवले आहे. गुजरातमध्ये ‘आप’ला मिळालेल्या मतांच्या संख्येनुसार आप आता राष्ट्रीय पक्ष बनला आहे. अवघ्या १० वर्षात आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्षांमध्ये सामील झाला आहे.

आम आदमी पक्षाला मिळाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा

केजरीवाल म्हणाले की, ‘ज्यावेळी मी गुजरातमध्ये गेलो तेव्हा मला खूप प्रेम मिळाले. मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. तो गड फोडण्यात आम्ही यशस्वी झालो. गुजरातमध्ये आम्हाला १३ टक्के मते मिळाली आहेत. गुजरातच्या लाखो लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. तुमच्या पाठिंब्याने आम्ही पुढच्या वेळी गड जिंकण्यात यशस्वी होऊ. आम्ही संपूर्ण मोहीम सकारात्मक पद्धतीने चालवली. कोणाला शिवीगाळ केली नाही. फक्त कामाबद्दल बोललो. हेच आम्हाला इतर पक्षांपेक्षा वेगळे ठरवते. आजवर बाकीचे पक्ष धर्म आणि जातीचे राजकारण करत आले आहेत. पक्षाच्या कामावर बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आम आदमी पार्टी हा देशातील ८ वा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.ज्यात काँग्रेस, भाजप, बसपा, सीपीआय, सीपीएम, एनसीपी आणि टीएमसीची नावे आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *