विधानसभेला २८८ पैकी २०० जागा जिंकू; चित्रा वाघ यांचा दावा

१४ डिसेंबर २०२२


भाजप नेत्या चित्रा वाघ आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आहे. आजपासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आजपासून सुरू होत आहे. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे ही आमची जबाबदारी आहे. अंबाबाईचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली आहे.

यावेळी चित्रा वाघ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ आणि विधानसभेला २८८ पैकी २०० जागा जिंकू, असा आत्मविश्वास व्यक्त केला. तसेच पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला मोर्चा देखील बुथवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निर्भया पथकातील गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापर होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितले की, निर्भया पथकाच्या गाड्या सर्वच पक्षातील नेत्यांनी वापरल्या आहेत. ज्यांनी टीका केली त्या सुप्रियाताई सुळे यांनी देखील निर्भया पथकातील गाडी वापरली आहे. हळूहळू या गाड्या जमा करून महिलांच्या सुरक्षेसाठी वापरल्या जातील.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *