आता केंद्र सरकारची दातखीळ बसली आहे; गलवान-तवांगमधील चिनी घुसखोरीवरून शिवसेनेचा हल्लाबोल

१४ डिसेंबर २०२२


अरुणाचल प्रदेशातील तवांग सीमेवर ९ डिसेंबर रोजी चिनी सैनिकांनी भारताच्या सीमा भागात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे भारत आणि चीन पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. दोन्ही देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशाचे सैन्य मागे हटले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. आधीच्या सरकारकडे बोट दाखवून तुम्ही पळ काढू नका, तुमची जबाबदारी तुम्हालाच स्वीकारावी लागेल, अशी टीका करण्यात आली आहे.

मोदी सरकार चीनविरोधात ‘जशास तसे’ धोरण राबवत आहे, चिनी सीमेवर हे सरकार तोडीस तोड संरक्षणसिद्धता करत असून येथील सीमाभागात पायाभूत सुविधांचे जाळे २०१४ नंतरच घट्ट विणले, असे दाखवायचे दात केंद्र सरकारची भक्त मंडळी येताजाता चमकवीत असते. मात्र, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर ९ डिसेंबर रोजी रात्री जे काही घडले, त्यामुळे दाखवायच्या दातांची ‘दातखीळ’ बसली आहे अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *