उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कुणीही मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत – नितेश राणे

१२ डिसेंबर २०२२


भाजपचे आमदार नितेश राणे यांनी धक्कादायक विधान केलंय. त्यांनी आपल्या वक्तव्यातून मतदारांना थेट धमकीच दिलीय. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर निधी देणार नाही, असं विधान नितेश राणे यांनी केलंय.

नितेश राणे म्हणाले, चुकनही इथे माझ्या विचाराचा सपरंच निवडून आला नाही तर मी एकही रुपया निधी देणार नाही, एवढी काळजी निश्चितपणे घेईन. आता तुम्ही ही धमकी समजा किंवा काहीही समजा. पण आपलं कॅलक्युलेशन स्पष्ट आहे. मतदान करताना हे लक्षात घ्या. कारण सगळा निधी माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजनचा निधी असो, ग्रामविकासचा निधी असो, २५-१५ चा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो. मी सरकारचा म्हणजे सत्तेत असलेल्या सरकारचा आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मुख्यमंत्री असतील, हे कुणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत,असं नितेश राणे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *