शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांची राष्ट्रवादीत घरवापसी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१४ ऑक्टोबर २०२१

मुंबई

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत घर वापस केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आज (गुरुवारी ) पुन्हा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला यावेळी त्यांच्या समवेत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते.

नारायण बहिरवाडे हे तसे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे कट्टर मानले जात पण आता गजानन चिंचवडे यांनी भाजपात तर बहिरवाडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. यानंतरच्या काळातही शिवसेनेचे अनेक नगरसेवक व कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar welcomed Bahirwade to the NCP
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहिरवाडे यांचे राष्ट्रवादी मध्ये स्वागत केले. यावेळी सोबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि माजी विरोधी पक्षनेते नाना काटे.

नारायण बहिरवाडे हे पंधरा वर्षे नगरसेवक होते त्यांच्या काळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.अगोदर काँग्रेस नंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता पुन्हा राष्ट्रवादी मध्ये स्वगृही परतले असल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. २०१७ मध्ये बहिरवाडे निवडून येणार असे सर्वाना वाटत असताना डार्क हॉर्स ठरलेले माजी उपमहापौर केशव घोळवे यांनी बहिरवाडे यांच्यावर अवघ्या १३० मतांनी निसटता विजय मिळवला.

आता २०२२ ला होणाऱ्या निवडणुकीत घोळवे, बहिरवाडे पुन्हा समोरासमोर आले तर पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.स्वगृही परतल्यानंतर पक्ष देईल ती जबादारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याने त्यांनी समाधान वेक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *