ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नाही, जिथं उद्धव ठाकरे तीच खरी शिवसेना – संजय राऊत

१२ डिसेंबर २०२२


शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नसून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं ते म्हणाले.

ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नाही. जिथं उद्धव ठाकरे तीच खरी शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई वाया जाणार नाही. महाराष्ट्राची जनता आयोगाच्या निर्णयाकडे बघत आहे. जरी एका बाजुने निकाल द्यायचा दबाव निवडणूक आयोगावर आहे, मात्र, तरीही धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असून न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *