विनायक चतुर्थी निमित्त रांजणगावच्या श्री महागणपती ला ५०१ शहाळ्यांची आकर्षक सजावट…

बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने, शुक्रवार दि. १६ एप्रिल २०२१ रोजी पहाटे ५.०० वाजता अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने दुपारी बारा वाजता महापुजा व महानैवेद्य करण्यात आला. येथील प्रगतशील शेतकरी व प्रसिद्ध बैलगाडामालक, श्री आनंदराव दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने, देवाला ५०१ शहाळे अर्पण करून आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहीती, विश्वस्त प्रा. नारायण पाचुंदकर यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी, शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून, “श्रीं” ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू असल्याचे विश्वस्त डॉ. संतोष रामा दुंडे यांनी सांगितले.

त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक श्री. बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असून, भाविकांना दर्शनासाठी सर्वच तिर्थस्थाने बंद असल्याने, केवळ आकर्षक सजावट किंवा आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असल्याचे उपस्थित सर्व विश्वस्त मंडळाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *