बैलगाडा शर्यतीचा लढा : सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात पुन्हा सुनावनी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० नोव्हेंबर २०२१

भोसरी


महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खाटल्यावर पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे, अशी माहिती पिंपरी – चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार , सदस्य बैल गाडामालक संघटना महेश लांडगे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत आज (दि. २९ ) सुनावणीस सुरुवात झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर सुनावणी झाली.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती

आमदार महेश लांडगे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती सशर्त सुरू करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायदा केलेला आहे. परंतु, या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. परिणामी, गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित आहे.

इतर राज्यात शर्यत, मग महाराष्ट्रात का नाही…

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी तात्काळ घेतली जावी याबाबत विनंती अर्ज केला होता. त्यानुसार आज सकाळी सुनावणीस सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. देशांमध्ये इतर राज्यात बैलगाडा शर्यती चालू आहेत. मग, महाराष्ट्रात का नाही? असा युक्तिवाद करत राज्यातील शर्यतींना परवानगी द्यावी, अशी विनंती न्यायमूर्तीं समोर केली. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून ॲड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला. पुढील आठवड्यात याबाबत उर्वरित सुनावणी होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेचे राधाकृष्ण टाकळकर यांनी दिली.

राज्य सरकारच्या वतीने ऍड. मुकुल रोहतगी यांनी केला युक्तिवाद


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *