१४ व्या मिनी सब ज्युनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा आमदार चषकाचे उद्‌घाटन आमदार आण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते पार पडले

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० डिसेंबर २०२२

निगडी


पिंपरी चिंचवड महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटना द्वारे आयोजित आमदार चषक १४ व्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ९ डिसेंबर रोजी ५:३० वाजता मदनलाल धिंग्रा मैदान निगडी येथे पार पडले. स्पर्धेचे उद्‌घाटन पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा दादु बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर स्पर्धा इंडियन, रिकर्क, कम्पाउंड या प्रकारामध्ये खेळली जाणार आहे.या स्पर्धेसाठी ३४ जिल्ह्यातील ६०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.सदर स्पर्धेतून निवडलेले स्पर्धक व त्यांचा चमु यांना आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार आहे.

धनुर्विद्या खेळाला शहरात वाव मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- आमदार अण्णा बनसोडे

धनुर्विद्या ही प्राचीन काळापासून भारतीय क्रीडा प्रकारात आहे मात्र हा क्रीडा प्रकार खर्चिक असल्याने इच्छा असून देखील अनेक स्पर्धकांना सहभागी होत नाही यासाठी यापुढे राजकीय पाठबळ देण्याची ग्वाही यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.पिंपरी चिंचवड शहरात स्पर्धा आयोजन केल्यामुळ शहरात हा खेळ अधिक विकसित होईल व येत्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडू देशात नाव गाजवतील असा विश्वास भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर यांनी व्यक्त केले.

 

स्पर्धेचे मुख्य आयोजक व आंतरराष्ट्रीय खेळाडू सोनल बुंदेले यांनी लिहलेला धनुर्विद्या ह्या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले.धनुर्विद्या खेळाबाबत इत्तभूत माहिती या पुस्तकातून नवोदित खेळाडूंना मिळनार आहे.आजच्या या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश फुगे, पॅरा मधील आंतरराष्ट्रीय खेळाडू अमोल बोरिवाले आणि छत्रपती पुरस्कार विजेते श्रीधर आखाडे यांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला.

उदघाटन कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आर एम कुमार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्राचा पहिला ऑल्मपिक खेळाडू प्रविण जाधव,जन प्रबोधिनी नवनगर विदयालयाचे प्राचार्य देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे छायावती देसले युवा उदयोजक विशाल सरवदे, पिंपरी चिंचवड जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *