समाजाने उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत करावी – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ डिसेंबर २०२१

ठाणे


प्रदेशध्यक्ष वसंत मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वात राज्य अधिवेशन यशस्वी

ठाणे (प्रतिनिधी) प्रसार माध्यामाचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही कमकुवत होईल, त्यामुळे समाजानेच माध्यामाची उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत करावी. पत्रकारांनीही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी, म्हणजे विश्वास वाढेल,असे सांगुन प्रबोधनाचे मार्केटिंग होणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी केले.पत्रकार संघाच्या मागण्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही दिली.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायातन सभागृहात मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी दोन सत्रात प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. मागील दोन वर्षांपासून कोरोना जागतिक महामारीमुळे पत्रकार संघाचे राज्यअधिवेशन टाळण्यात आले होते.

मात्र यंदा पत्रकार बांधवांच्या आग्रहाखातर कोरोना नियामाचे पालन करून प्रदेशध्यक्ष वसंत मुंडे यांच्या खंबीर नेतृत्वखाली ठाण्यात सोळावे राज्य अधिवेशन यशस्वीरित्या संपन्न झाले. कोरोना काळात वृत्तपत्र व पत्रकारांसमोर उध्दभवलेल्या समस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, ऑनलाइन चर्चा करून, संपादकांची गोलमेज परिषद घेवून तसेच विभागीय अधिवेशनाच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यामुळेच या अधिवेशनात दोन्ही सत्रात वृत्तपत्रसृष्टी समोरील समस्या व उपायावर चर्चा होऊन भविष्यात सकारात्मक कार्य करण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित पत्रकार बांधवांनी वक्त केली.

अंक विक्रीचे पारंपरिक धोरण बदलले तरच मराठी वृत्तपत्राना स्थैर्य – प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, मनिष केत, नितीन जाधव यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातून पाचशे पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी मराठी पत्रकरीतेचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती यावर नेमकेपणाने बोट ठेवले.पत्रकारांच्या हत्या आणि अटक याचा उल्लेख करत पत्रकारांसमोरील धोके स्पष्ट केले. लोकशाहीत पत्रकार हा चौथा खांब असल्याने लोकशाहीची इमारत मजबूत आहे.बदलत्या परिस्थितीत माध्यमांचा प्रभाव कमी झाला तर लोकशाहीच कमकुवत होईल.त्यामुळे समाजानेच माध्यामाची उपयुक्तता ओळखुन वृत्तपत्रांना मदत केली पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनीही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी.म्हणजे लोकांचा वृत्तपत्रांवरील विश्वास वाढेल. आपल्या बाबत कोणाच्या सांगण्यावरून दिलेल्या दोन बातम्याची उदाहरणे देऊन त्यांनी पत्रकरीतेतील चुकीच्या बाबीबरही परखड मत मांडले. पण अपवाद वगळता पत्रकारांमुळेच समाजच प्रबोधन होत. त्यामुळे प्रबोधनाचे मार्केटिंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे अवाहनही त्यांनी केले.शेवटी ना. पाटील यांनी राज्य पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करून केंद्रीय स्तरावरील मागण्यांसाठी मदत करण्याची ग्वाही दिली.

पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपली भूमिका मांडताना पत्रकारांसमोरील समस्यांचा सविस्तर मागोवा घेतला .कोरोनानंतर प्रादेशिक वर्तमानपत्रांसमोरील आव्हाने मांडून त्यांनी वृत्तपत्रे आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे आणि असे केले तरच या क्षेत्रात काम करणाऱ्याना रोजगाराचे स्थैर्य मिळेल, असे सांगितले.शेवटी त्यांनी पत्रकार संघाच्या वर्षभरातील कामाचा अहवाल सादर केला.सरचिटणिस विश्वास आरोटे व कोकण विभागिय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

अधिवेशनात मांडले पत्रकारांचे विविध ठराव

वृत्तपत्र ग्राहकांना उत्पन्न करात वर्षीक पाच हजाराची सवलत द्यावी.जाहिराती वरील पाच टक्के जीएसटी कमी करावा. पत्रकारांचा प्रतिनिधी विधीमंडळात नियुक्त करावा. ,पत्रकार सन्मान योजनेतील जाचक अटी शिथिल करण्यात याव्यात. वृत्तपत्र अंक विक्री किंमत उत्पादन खर्चावर आधारित ठरवण्याचे अधिकार वृत्तपत्र चालकांना असावेत.वृतपत्रानीही आठवड्याची सुट्टी घ्यावी. यासह विविध महत्वाचे ठराव यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि राज्यातील उपस्थित पत्रकारांच्या सहमतीने मांडण्यात आले. या अधिवेशनात राज्य पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र, दैनंदिनी,बॅग,हेल्मेट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *