कोंढवळ येथील धबधब्यात युवक बुडाला ; युवकाला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

भिमाशंकर : –
आंबेगाव ब्युरोचिफ,
मोसीन काठेवाडी

आंबेगाव तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी भागातील भीमाशंकर खोऱ्यात दमदार पाऊस सुरू असल्याने कोंडवळ येथील चोंडीबा नावाचा प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी आणि पर्यटक येत आहेत. या धबधब्यात आज दिनांक १७ रोजी सकाळी साडे नऊ वाजलेच्या सुमारास फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा पडून बुडला असल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी घोडेगाव पोलीस प्रशासनतातडीने धाव घेतली आहे तसेच  वन विभाग प्रशासन दाखल झाले असून या तरुणाला शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून तरुणाचा अद्याप शोध लागला नाही.

या बाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की शिक्रापूर येथे कामानिमित्त  वास्तव्यास असलेला तरुण लक्ष्मण सोन्याबापू लहारे ( वय 29 रा,राहुते अहमदनगर )
व त्याचे तीन मित्र व दोन लहान मुले भीमाशंकर परिसरात फिरण्यासाठी आले होते.मंदिर बंद असल्याने ते कोंढवळ येथे निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी लक्ष्मण लहारे हा धबधब्याच्या बाजूला गेला असता पाय घसरून तो धबधब्यात पडला असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह व दाब मोठ्या प्रमाणात असल्याने ते त्याला वाचवू शकले नाही. धबधबा खाली खोल असल्याने व कपाऱ्या असल्याने बेपत्ता तरूण अद्यापही मिळुन आला नाहीये. या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस प्रशासन,वनविभाग प्रशासन ,पोलीस पाटील सुभाष करोटे, विजय मेमाणे ,इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाण्यात गळ टाकून तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही.या बाबत एन. डी. आर.एफ. यांना कळविले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Advertise

दरम्यान या धबधब्यावर या आगोदरही २०१५ मध्येही एका युवकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच २८ सप्टेंबर २०१८ ला ही चाकण येथील इंजिनियर बुडाल्याची घटना ताजी असताना वारंवार अशा घटना येथे घडत आहे. त्यामुळे  पर्यटन व संबंधित विभागाने या पर्यटन स्थळ ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने माहिती फलक व इतर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी सुभाष तिटकारे , सागर कोकाटे,मारुती केंगले यासह स्थानिक ग्रामस्थ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *