सोने आणि रोख रक्कम चोरणारे अट्टल चोरटे जेरबंद

पवन गाडेकर
निवासी संपादक
१७ जानेवारी २०२२

जुन्नर


राहत्या घराची कौले उचकटून घरात प्रवेश करून चोरट्यांनी विमल बाळू गवारी वय वर्षे ५५ रा.गवारवाडी वैष्णवधाम यांच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद १३ जानेवारी रोजी विमल गवारी यांनी दिली होती.त्या प्रमाणे पोलीसांनी तपास केला असता घरफोडी करणा-या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून चोरट्यांन कडून पोलीसांनी चोरट्यांनी चोरलेले दागिने आणि रोख रक्कम जप्त केली असल्याची माहीती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली.

फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार जुन्नर पोस्टे गु.र.नं १३/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल झाला होता.दिनांक १३जानेवारी रोजी विमल बाळू गवारी बुधवार दि.१२ जानेवारी रोजी गवारवाडी येथील त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून त्यांच्या पतीसह बारव ता.जुन्नर येथिल जुन्या घरी राहायला गेल्या होत्या.एक दिवस मुक्काम करून दि.१३ जानेवारी रोजी परत गवारवाडी येथील घरी आल्यावर घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला तर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कपाट ही उघडलेले दिसले असता कपाटत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम कपाट मिळून न आल्याने गवारी यांनी 13 जानेवारी रोजी जुन्नर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती. त्याप्रमाणे वाढत्या घरफोडयांचे प्रमाण लक्षात घेता सदर चा गुन्हा हा लवकरात लवकर उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर पोलीस स्टेशन ला दिल्या होत्या.

जुन्नर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

त्यानुसार गुन्हे शाखा व जुन्नर पोलीस स्टेशन ची पथके सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना फिर्यादी वरून सदर चा गुन्हा हा कोणीतरी पाळत ठेऊन अगर ओळखीच्या इसमाने केला असल्याचा संशय आल्याने आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता पोलिसांनी एका विधिसंगर्शित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर चा गुन्हा त्याचा साथीदार १ )ओंकार बाळू गवारी वय १९ रा. गवारवाडी वैष्णव धाम* व अजून एक विधिसंघर्षात बालक यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरी केले ले सोने व रोख रक्कम असा एकूण ४,१९,४६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे,जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे,यांच्या सूचने नुसार पो.नि. अशोक शेळके स्था.गु.शा. पुणे ग्रामीण, पो.नि. विकास जाधव जुन्नर पो.स्टे,स.पो. नि.गंधारे स्था.गु.शा. पुणे ग्रामीण, यांच्या मार्गदर्शनाखालीपोसई दिलीप पवार जुन्नर पोस्टे,स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे पो.हवा दिपक साबळे, पो.ना. संदिप वारे. पो.शि. अक्षय नवले तसेच जुन्नर पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार लोहकरे, पो नाईक मस्के, पो नाईक पठारे, पो.शि जोरी, पो.शि वणवे,पो.शि कारखीले यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *