धनंजय मुंडे यांच्या नावाने पैशांची मागणी, गुन्हा दाखल

१० डिसेंबर २०२२

पिंपरी


माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधून बोलत असल्याचं सांगत पिंपरी परिसरात चिखली या ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या व्यवस्थापकाला धमकीचा फोन आला. शिवीगाळ आणि दमबाजी करत संबंधिताकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शुक्रवारी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवदास साधू चिलवंत (वय ४१ वर्ष, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. मी धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमधून बोलत आहे असे सांगत त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. शिवाजीनगर येथे धनंजय मुंडे यांच्या ऑफिसमध्ये पैसे आणून दे, असे म्हणत फोनवरुन त्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे.


 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *