नारायणगाव वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ…

नारायणगाव दि २७ (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) – नारायणगाव – वारुळवाडी ग्रामपंचायतीचा संयुक्तिक घनकचरा व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच येथे करण्यात आला. ग्रामपंचायत नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष खैरे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व ऍड.राजेंद्र कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष दांगट, राजेश बाप्ते, गणेश पाटे, आरिफ आतार, मजी सरपंच जंगल कोल्हे, जालिंदर कोल्हे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, घनकचरा व्यवस्थापन तज्ञ प्रवीण खंडागळे, आनंद पोखरणा, अजित वाजगे, भागेश्वर डेरे, किरण ताजणे, ईश्वर पाटे,आकाश कानसकर यांसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या की, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पातळीवरील व पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रांतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व पुढे बायोगॅस निर्मिती प्रकल्प करणारी एकमेव ग्रामपंचायत असून हा प्रकल्प ३ कोटी २० लाखांचा असून दोन्ही गावाच्या विकासासाठी फायदेशीर ठरेल. सरपंच मेहेर व पाटे म्हणाले की जवळपास २० वर्षांपासुनचा कचरा या कचरा डेपोत असुन या घनकचरा व्यवस्थापनासाठी नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत मिळुन जवळपास २५ लाख रु प्राथमिक खर्च असुन यापुढे बायोगॅस निर्मिती प्रकल्प करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा सेपरेट करावा लवकरच नारायणगाव ग्रामपंचायतकडुन कचऱ्याच्या डब्यांचे वाटप करण्यात येणार असुन ग्रामपंचायतकडुन कचर्‍यात जाणारे प्लास्टिक व मेटल जमा करुन त्याचा मोबदलाही नागरिकांना ग्रामपंचायतकडुन दिला जाणार आहे. ग्रामपंचायत सातत्याने गावाच्या विकासाचे प्रकल्प राबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *