खाजगी कंपन्या सामाजिक बांधिलकी जपत धावल्या पिपरी चिंचवडकरांच्या मदतीला. शहराच्या महापौर माई ढोरे यांनी केली कृतज्ञता वेक्त..

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. १९ मे २०२१
कोरोना रुग्णाची ऑक्सीजन अभावी प्रकृती बिघडल्यास तातडीची उपाययोजना म्हणून कोरोना रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात घरी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. अनेक खासगी कंपन्या सामाजिक बांधिलकीतून महानगरपालिकेस शहर कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीकोनातून विविध यंत्रसामुग्री देत आहेत. त्याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

      कॉनफेरडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज आणि सॅनी हेव्ही इंडस्ट्री प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीमार्फत सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) महानगरपालिकेचे ५० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स आज सुपूर्त केले.   यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, कॉनफेरडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज कंपनीचे अध्यक्ष तथा सॅनी हेव्ही इंडस्ट्री प्रायव्हेट लिमीटेड ते व्यवस्थापकीय संचालक दिपक गर्ग, उपव्यवस्थापक श्रीबाल पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.   

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्सची मागणी करावयाची झाल्यास त्यांनी महापालिकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर ७७६८००५८८८ संपर्क करावा. ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्सची मागणी केल्यास प्राप्त ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स मधून रुग्णांच्या घरी पोहोच करुन ते ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स स्थापित करुन देणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत प्रस्तुतच्या कामाकाजासाठी १ वैद्यकीय अधिकारी व ३ कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. अशी माहिती महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली