दिव्यांग व्यक्तींचा सन्मान करण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा खूप आनंद वाटला – राणिताई कर्डीले

बातमी प्रतिनिधी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरुर

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रामलिंग महिला उन्नती बहु. सामाजिक संस्था आणि मानव अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने हा दिन प्रेरणा पुरस्कार देऊन साजरा करण्यात आला. ह्या व्यक्ती दिव्यांग असूनही समाजामध्ये ताठ मानाने स्वतःचा उदरनिर्वाह करत, इतर अनेक सामाजिक कार्य करत आहेत. या व्यक्ती पायाने अपंग असूनही अनेक महान कार्य यांच्या हातून होत आहे. अशा व्यक्तींना भविष्यात अजून प्रेरणा मिळण्यासाठी, यांच्या कार्याचे कौतुक व्हावे, इतरांनाही प्रेरणा मिळावी या हेतूने संस्थेच्या वतीने, मान्यवरांच्या उपस्थितीत आलिया तिरंदाज, मनीष सोनवणे व सुरेश पाटील या दिव्यांग व्यक्तींना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे शिरुर ग्रामीण चे सरपंच-नामदेव जाधव, मा. सरपंच-रामदास जामदार, सदस्य-यशवंत कर्डिले, ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब, तलाठी-एस. टी. देशमुख, सामजिक कार्यकर्ते-शिवाजी दसगुडे, निलेश लोंढे, गौतम घावटे, प्रकाश ठुबे, अर्जुन निचित उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचा अध्यक्षा राणी कर्डिले, उपाध्यक्षा राणी शिंदे, रुपाली बोर्डे, सचिव शशिकला काळे, सहसचिव मनीषा तरटे, जनाबाई मल्लाव, संपर्क प्रमुख आशा पाचंगे, स. प्रमुख ललिता पोळ, शहर प्रमुख शेख भाभी, सुनंदा घावटे, शर्मिला नीचित, मनिषा पठारे यांनी केले होते. पुरस्कार्थींना फेटा बांधून, ट्रॉफी व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, अशाप्रकारच्या पुरस्कारांतून आम्हा सारख्या दिव्यांगांना चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन नीचीत यांनी केले. तर, संस्थेचा अध्यक्षा राणी कर्डिले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *