पिंपरी-चिंचवडमध्ये तीन टोळ्यांवर मोका कारवाई

०९ डिसेंबर २०२२

पिंपरी


चाकणमधील एक व तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली.

चाकण ठाण्याच्या हद्दीतील सत्यम ऊर्फ पप्पू दत्तात्रेय कड (वय २२, रा. कडाची वाडी, चाकण) या टोळीप्रमुखासह इतर दोघांवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणीसाठी अपहरण, खंडणी मागणी, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला असे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत. तसेच तळेगाव दाभाडे ठाण्याच्या हद्दीतील कुणाल ऊर्फ बाबा धीरज ठाकूर (वय २२, रा. गणपती चौक, तळेगाव दाभाडे ) या टोळी प्रमुखासह इतर १३ जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत आदी सात गुन्हे दाखल आहेत. तर करणसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय २५, रा. रामटेकडी, हडपसर ) या टोळी प्रमुखासह इतर एकावर खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, शस्त्र बाळगणे असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.

हे आरोपी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून, हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळ्यांवर मोका कारवाई करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *