तेराव्याच्या दिवशी आंब्याच्या रोपट्यांचे वाटप…शिंगोटे कुटुंबाचा पर्यावरण पूरक अनोखा उपक्रम..

प्रतिनिधी-कैलास बोडके

खामुंडी (ता. जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी संतोष काशिनाथ शिंगोटे यांचे २५ एप्रिल रोजी आकस्मित निधन झाले होते. धार्मिक रूढी परंपरेनुसार त्यांचा तेरावा कोरोनाचे सगळे नियम पाळून साजरा करण्यात आला.या तेराव्याच्या कार्यक्रमाचा अवांतर खर्च टाळून कार्यक्रमात येणाऱ्या तेरा जणांना भेट म्हणून आंब्याची १३ रोपटे भेट देण्यात आले ही आंब्याची रोपटी म्हणजेच संतोष शिंगोटे यांची आठवण म्हणून वाटप करण्यात आले आहे असे त्यांच्या पत्नी सोनल शिंगोटे यांनी सांगितल.

या रोपट्यांना जीव लावा आणि मोठ करून निसर्गात ऑक्सिजन वाढवायला मदत करा असे देखील त्यांच्या कुटुंबाने सांगितले आहे. सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. त्याप्रमाणे पर्यावरणात सुद्धा ऑक्सिजन वाढण्याची गरज लक्षात घेऊन शिंगोटे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत आंब्याची रोपटे वाटपाचा हा अनोखा उपक्रम राबवला. यामुळे परिसरातून शिंगोटे कुटुंबीयांच कौतुक होत आहे.मृत व्यक्तीचे दुःख विसरून या कुटुंबांनी पर्यावरणाचा संदेश दिल्याने परिसरातून कौतुक होत आहे. ही रोपटी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना प्रदीप मुरादे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या प्रसंगी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष उपेंद्र डुंबरे , प्रसिध्द कांदाव्यापारी प्रदीप मुरादे व प्रमोद बनकर, रूपेश शिंदे, जितेंद्र रोकडे, नवनाथ शिंगोटे आदी उपस्थित होते