स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? मग दाखवा ना आता कर्नाटकाला भाईगिरी – संजय राऊत

०७ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गंभीर बनला असून आता दिल्लीमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात अमित शाह यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या बसेसची तोडफोड केल्याच्या काही घटना समोर आल्यानंतर त्यावरून वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसून दादागिरी करतो. स्वत:ला भाई समजणारे मुख्यमंत्री आहेत ना? त्यांना भाई म्हटलं जातं. त्यांनी भाईगिरी दाखवावी ना. मग कसले भाई तुम्ही? भाई काय, तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या.ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा. नाहीतर महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं महाराष्ट्रातलं सरकार गेलं खड्ड्यात,असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *