शरद पवारांना बेळगावात जायची गरज पडणार नाही – देवेंद्र फडणवीस

०७ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया घेत थेट सरकारालाच अल्टीमेटम देत स्वत: बेळगावात जाणार असल्याचे म्हंटले आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका मांडली. शरद पवारांना बेगळावात जाण्याची गरज पडणार नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शरद पवार यांना बेळगामध्ये जाण्याची गरज पडणार नाही, हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आपल्या संविधानाने प्रत्येकाला कोणत्याही राज्यामध्ये जाण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या राज्यात याची पायमल्ली होत असेल तर त्या राज्य सरकारने रोखलं पाहिजे. जर असं लक्षात आलं की हे राज्य सरकार रोखत नाही तर निश्चित हे केंद्रापर्यंत न्यावं लागेल. महाराष्ट्र हा न्यायप्रियतेसाठी ओळखला जातो त्यामुळे कोणी काही करत असेल तर पोलीस त्यांनी रोखतील, असं फडणवीसांनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *