प्रतिनिधी-कैलास बोडके
सध्या कोरोनाचा काळ असल्याने महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कार्यकारणची महत्वाची ऑनलाईन झूम मिटिंग प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत सद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी याबाबत लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती प्रज्योत फुलसुंदर यांनी दिली.
त्याच बरोबर महात्मा फुले ब्रिगेडचे नवीन पदाधिकारी निवड करणे. मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे.ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे. महात्मा फुले यांच्या नावाने सुरु असलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभ घेऊ इच्छित रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने सहकार्य करता येईल याची सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश सोनवणे,वर्षा माळी, पन्नालाल टाक, प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे, प्रदेश संपर्क प्रमुख डॉ. धनराज देवरे, प्रदेश सोशिअल मीडिया प्रमुख इंजि. प्रज्योत फुलसुंदर आणि राज्य कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.