पुण्यात गोवरचे पाच रुग्ण; महापालिकेकडून बूस्टर डोस देण्यास सुरुवात

०१ डिसेंबर २०२२

पुणे


पुण्यामध्ये गोवरचे पाच रुग्ण आढळुन आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कुदळवाडी या भागात पाच गोवरचे रुग्ण आढळले आहेत. एकाच परिसरात गोवरच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे महापालिका अलर्ट झाली आहे. गोवरचे रुग्णांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून मुलांना बुस्टर डोस देण्यास पुणे महापालिकेने सुरुवात केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात २९ संशयित रुग्ण आढळले होते. या सगळ्यांची रक्त तपासणी करण्यात आली होती. त्यातील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात ९ वर्षांपर्यंतच्या बालकांचा समावेश आहे. दोन बालकं एक ते चार तर दोन बालकं पाच ते नऊ वयोगटातील आहे. मात्र या पाचपैकी एकाही बालकाला गंभीर लक्षण नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र गावात अजून रुग्ण वाढू नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *