आदिवासी गावांमध्ये किसान सभेसहित विविध संघटनांचा जनजागृती जत्था

०७ सप्टेंबर २०२० बातमी – विकास भालचिम,आंबोली प्रतिनिधी

इको सेंन्सेटिव्ह झोन रद्द करा.

पेसा आणि वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा.

रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक गाव-वाडी-वस्तीत चालू करा.

मागेल त्याला काम मिळालेच पाहिजे.

घोषणा देत आदिवासी गावांमध्ये किसान सभेसहित विविध संघटनांचा जनजागृती जत्था.
इको सेंन्सेटिव्ह झोन बाबतचा अध्यादेश मागे घ्यावा. पेसा आणि वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी यासाठी किसान सभा जुन्नर तालुका समिती, एस. एफ. आय. आदिवासी अधिकारी राष्ट्रीय मंच आणि भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ या संघटनच्या वतीने जुन्नर तालुक्यातील गावांमध्ये जनजागृती जत्था काढण्यात आला होता.

हडसर, निमगिरी, खटकाळे-खैरे, देवळे, अंजनावळे, घाटघर, फांगुळ गव्हाण, पुर, शिरोली, माणकेश्वर आदि गावांमध्ये सोशल डिस्टंचे पालन करत जनजागृती करण्यात आली.

या वेळी संघटना, पक्ष, जाती जमाती भेद बाजूला सारून सर्वांनी येणाऱ्या काळात इको सेंन्सेटिव्ह झोन आणि आदिवासी समजाच्या विकासासाठी, आदिवासी हक्क अधिकारांसाठी, रोजगार, शिक्षण, रेशनसहित मुलभूत गरजा , भौतिक विकासाच्या विविध मागण्यांसाठी एकजूटीने सविंधानिक मार्गाने लढा उभा करण्याचे आवाहन करण्यात आले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य मा. देवरामशेठ लांडे, पंचायत समिती सदस्य मा. काळूशेठ गागरे, मा. युवराज लांडे, मा. तुळाबाई बोऱ्हाडे, मा. उपसरपंच माधुरीताई कोरडे, मा. पोपट रावते. मा. चंदर शिंगाडे, मा. सरपंच मुकुंद घोडे, मा. पो. पाटील सोमा बुळे, काळू लांडे. मा. बुधा बुळे, मा. संजय साबळे, मा. सुनिल कोरडे, दिपक सांगडे, विशाल सांगडे, झेंपु लांडे, सचिन घुटे, सचिन मोरे, देवराम जोशी यांच्या सहित वेगवेगळ्या गावांमध्ये विविध पक्ष, संघटना, सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्त्ये, पदाधिकारी यांनी या जनजागृती जथ्याचे स्वागत केले.

या जनजागृती जथ्यात किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, जुन्नर तालुका सचिव लक्ष्मन जोशी, सदस्य विलास डावखर, नारायण वायाळ. एस एफ आयचे पदाधिकारी राजू शेळके, नवनाथ मोरे, अक्षय घोडे, पिलाजी शिंगाडे, ë