शिवजन्मभूमी फाऊंडेशन, नारायणगाव – शिर्डी सायकलवारी टीम, पहाटवारा स्विमिंग ग्रूपच्या वतीने जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०१ डिसेंबर २०२२

नारायणगाव


शिवजन्मभूमी फाऊंडेशन, पहाटवारा स्विमिंग गृप नारायणगाव ते शिर्डी सायकलवारी टीमतर्फे जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नारायणगाव येथे विशेष गौरव व सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवजन्मभूमी ते कन्याकुमारी सोलो सायकलिंग केलेल्या सुधाकर लोंढे,भारताचे पाश्चिम ते पूर्व टोक सायकलिंग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड करणा-या प्रिती म्हस्के,भारत धाम यात्रा करणारे हभप अंकुश महाराज मोरे, राज्य विक्रिकर निरीक्षकपदी राज्यात प्रथम आलेले विवेक वायकर,१२ तास वीस मिनिटे सलग कीर्तन गायन वर्ल्ड रेकोर्ड करणारे हभप किरण महाराज बनकर, सलग २२ वर्ष आळंदीस पायी जाणाऱ्या सर्व पालख्यांची सेवा करणारे रामशेठ दळवी, साई मंदिराला ११ गुंठे जागा मोफत देणारे गिरीश विनायक रसाळ, पंजाब येथील जगप्रसिद्ध संतश्रेष्ठ नामदेव महाराज नगरी घुमान पर्यंत सायकल प्रवास केल्या बद्दल मारुती कडाळे, हिराबाई बाजीराव कानवडे, राजगुरूनगर बँकेचे नवनिर्वाचित तज्ञ संचालक दीपक वारूळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवजन्मभूमी फौंडेशन चे अध्यक्ष धनंजय माताडे, अभिजित शेटे, सुनिल इचके, संदेश शिंदे, हरिओम ब्रम्हे, रूतिक गुंजाळ, ऋतिक माताडे, पवन घोलप,राजू भोरे आदींनी केले. याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे.एल. वाबळे, दिपक वारूळे, जितेंद्र गुंजाळ, बाळासाहेब शेलोत, उद्योजक अशोक खांडगे, रविंद्र वाघुले, डॉ. बंगाळ,डॉ घाडगे, संपत शिंदे, शरद दरेकर, पोलीस उप निरीक्षक पाटील यांच्या हस्ते मान्वरांना सन्मानित करण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *