पोलिस निरीक्षक टी. वाय मुजावर यांची बदली

आळेफाटा (वार्ताहर-विभागीय संपादक रामदास सांगळे):-

आळेफाटा (ता.जुन्नर), पोलिस ठाण्याचे दबंग पोलीस अधिकारी म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांची बदली झाली असून ते आता जिल्हा वाहतूक शाखेत रूजू होणार आहेत.

आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून दोन वर्ष, नारायणगाव येथे दोन वर्षे ओतूर मध्ये दीड वर्ष अस त्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये साडेचार वर्ष सेवा केली. जाधववाडी-बोरी जाधव येथील गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त केले.आळेफाटा येथे नुकताच लाखो रुपयांचा गुटखा पकडला. त्याचबरोबर गोमांस,अवद्य दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.

खून दरोडे चोरी अशा अनेक गुन्ह्यांचा मोठ्या शिताफीने तपास करुन या गुन्ह्यांची उकल केली व गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केले आहे.मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमूळे चो-यांचे सत्र वाढण्याची शक्यता ग्रुहीत धरून त्यांनी आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावांमध्ये ग्रामसुरक्षा दले स्थापन केली.

लाॅकडाऊनच्या काळात पोटपाण्याच्या व्यवसायासाठी भटकंती करुन अनेक गरीब कुटुंब आळेफाटा या ठिकाणी आले होते. त्यांची होत असलेली उपासमार पाहून त्यांनी या कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करुन त्यांनी खाकी वर्दीच्या आड एक माणूस असतो हे दाखवून दिले. अत्यंत कष्टाळू आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यांनी केलेल्या कामाचे नागरीकांमधून नेहमीच कौतुक होत आहे.