पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरचा शिरकाव

३० नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवडमध्ये गोवरने शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पाच बालकांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मंगळवारी खळबळ उडाली. पाच संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह आले असून उद्रेक होऊ नये, यासाठी पालकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गोवर आजाराच्या सातपैकी पाच संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह आहेत. कुदळवाडी परिसरातील बालकांना लागण झाली आहे. या रुग्णांची रक्त तपासणी व घशातील द्रावाची तपासणी मुंबई येथील हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामुळे महापालिकेकडून कुदळवाडी परिसरात गोवर या आजाराचा उद्रेक घोषित करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये गोवर या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड परिसरात गोवरचे रुग्ण आढळल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात गोवरचे तीन रुग्ण आढळले होते. तर, मंगळवारी (दि. 29) पाच रुग्णांच्या घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. राज्यातील इतर शहरात गोवरचे रुग्ण आढळू लागल्यानंतर महापालिकेकडून रहिवाशी क्षेत्रात गोवर आजाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *