आदित्य ठाकरेंनी बिनकामाचे रिकामटेकडे माजी मुख्यमंत्री घरी बसून आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करावी – अतुल भातखळकर

३० नोव्हेंबर २०२२


शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले.शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं स्पष्ट होत आहे. यावर वस्तुस्थिती समोर यावी म्हणून जाहीर चर्चा करावी, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यांच्या या आव्हानावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासारखे रिकामटेकडे आणि बिनकामाचे वाटले की काय?, त्यांना चर्चाच करायची असेल तरी बिनकामाचे रिकामटेकडे माजी मुख्यमंत्री घरी बसून आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करावी असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *