रुग्णसेवेच्या नावाखाली भरत होता स्वतःचा खिसा…स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारा आळे येथील आरोग्य कर्मचारी अमोल पवार यावर गुन्हा दाखल…

रुग्णाणच्या नातेवाईकांनी केली आरोग्य मंत्रांकडे तक्रार

आळे प्राथआरोग्य केंद्रातील मेडीकल फार्मासीस अमोल पवार हा कर्मचारी स्वत:च्या रुग्णवाहीचे अव्वाच्या सव्वा भाडे घेणारा पुन्हा चर्चेत स्वतः ची रुग्णवहिका वापरून व्यवसाय करत असून रूग्णांना मदत करण्याच्या नावाखाली लूट करत असल्याचे समोर आले आहे.
आळे येथील पं स सदस्य जिवन शिंदे यांच्या नावाचे फोटोचे स्टीकर गाडीवर वापरून कोरोना पेशंटला मदत करतो या नावाखाली अडवणूक करून पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
नाशिक सिन्नर येथील एकत्र कुटुंबातील दोन भाऊ व आई कोविडने ग्रस्त असताना आळे येथिल नातेवाईकांच्या माध्यमातून आळेफाटा येथे बेड मिळेल या आशेने संपर्क सुरू केला. अमोल पवार याने बेड मिळवून देतो असे सांगून 1 लाख 80 हजार रूपये द्या अशी मागणी केली, चार पेशंट ला बेड मिळणं महत्वाचं होतं ईलाज नव्हता म्हणून तात्काळ कुटूंबीयांनी ऑनलाईन पैसे अमोल पवार याच्या खात्यावर जमा केले.


पुढे सरकारी वायसीएम रूग्णालय पिंपरी चिंचवड येथे बेड उपलब्धच होते तेथे पवार याने रूग्ण अड्मिट केले. पुढे त्यातील 3 रूग्ण उपचारा दरम्यान दगावले, आई व दोन मुले मयत झाले, कुटूंबावर शोककळा पसरली, दोन्ही भाऊ व त्यांची आई जग सोडून गेले, मुलांचा आधार संपला कुटूंब पोरके झाले, अत्यंत वाईट काळात,मदतीची अपेक्षा जनता करताना सरकारी बाबू मात्र अडचणीचा फायदा घेवून मढ्यावरचं लोणी खाण्यात मग्न आहेत. याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी, अमोल पवार नावाच्या रुग्णवाहीका मालकावर कठोरातली कठोर कारवाई करून संबधित कुटुंबाला न्याय द्यावा हीच अपेक्षा.
तालुक्याचे विद्यमान आमदार, जि प अध्यक्ष व संबंधित अधिकारी याची गंभीर दखल घेऊन अशा अमोल पवार सारख्या व्यक्ती वर कारवाई करतील का असा प्रश्न जनते समोर उभा राहिला आहे..
संबंधित गुन्हेगारांवर आळेफाटा पोलीस चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *